Search This Blog

Monday, July 27, 2020

बाई एसटी माई


बाई एसटी माई सांग कव्हा येशील
डोस्क्यावरचं गठुडं गावी कव्हा नेशील
वाट पाहत बसलो कव्हाचं फाट्यावर
आता तरी ये आम्हा गरीबाच्या वाट्यावर
बाई एसटी माई सांग कव्हा येशील

खाजगी गाड्या आता परवडायच्या नाही
तुह्याशिवाय दुसरं गाव दावायचं नाही
लय दिवसाचं खोळंबलं लेकीचं लेकरू
केव्हा भेटवशील बाई गायीला वासरू
बाई एसटी माई सांग कव्हा येशील

तालुक्याला जाऊन कागदपत्रं काढायची
पेरणीसाठी कर्जाची विनती हाय करायची
शाळाविना पोरं उगाच फिरतात संटी
आता तरी वाजू दे रोजची तुही घंटी
बाई एसटी माई सांग कव्हा येशील

कामाचे झाले वांदे थांबलेत आठवडी बाजार
रिकाम्या खिश्यासंग माणसं झाली लाचार
कानाला सवय लागली तुह्या आवाजाची
तूच हाये खरी रक्तवाहिनी आमच्या गावाची
बाई एसटी माई सांग कव्हा येशील
डोस्क्यावरचं गठुडं गावी कव्हा नेशील

- राणी अमोल मोरे12 comments:

 1. बाई एसटी माई आमच्या गावी कधी येशील..

  ReplyDelete
 2. Khup chhan garibanchi may ahe sT ,ya corona kalatil khar wastav samor anlay

  ReplyDelete
 3. Garib kay,srimant kay. Saglyanchi vaat lagli ashe ya lockdown mule.Pan gavkaryanchi vyatha chan mandali aahe.

  ReplyDelete
 4. lal Dabba...lifeline of villages... Ironically struggling to survice on recent days

  ReplyDelete
 5. एस टी शिवाय खूप परिवार अपूर्ण आहेत.आजवर ह्या एस टी नी कित्येक IAS IPS MLA MLC घडवले.
  अप्रतिम वाक्यरचना...👌👌👌

  ReplyDelete
 6. Excellent Poetry

  ReplyDelete
 7. अत्यंत समर्पक आणि वास्तवदर्शी कविता आहे, लासल परी आणि गावकरी यांचे अतुट नाते पूर्णपणे जाणवून दिले आहे.सुंदर

  ReplyDelete
 8. अद्भुत,
  लॉकडाऊन, गावातील नागरिकांची परिस्थिती, एस टी चे महत्व अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. छान मांडणी.

  ReplyDelete
 9. वास्तववादी दुनियेत जाणारी कविता.

  ReplyDelete
 10. खरं ग्रामीण भागाचे दर्शन घडविणारी कविता... छान कल्पना.. नाव समर्पक....all the best..

  ReplyDelete
 11. अगदी बालपनीच्या आठवनी ऊजाळल्या, गावाच्या फाट्यापर्यंत धावत येऊन शाळेला जाण्यासाठी ST ची वाट पाहत बसनं ती मजाच वेगळी होती. छान रचना..

  ReplyDelete

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

पर्यावर्णिय बदल, मानसाच्या जाती आणि आरक्षणे

सध्या परिस्थितीचा विचार लक्षात घेता असे दिसून येते की मानसाला भविष्यामध्ये स्वत:ला माणूस म्हणून टिकून राहण्यापेक्षा स्वत:च्या जाती धर्मांची ...

Most Popular Posts