Search This Blog

Thursday, July 16, 2020

ऑफिस-ऑफिसआपलं गड्या ऑफिस लय हाय भारी 
गोष्ट सांगतो त्याची आज तुले खरी 
उन्हा पाण्यात धाव धाव नित्य मी सुटतो
घेत नाही सुट्टी रोज हजर राहतो

कामात न्हाय सोडत जराबी सैल
जणू मी ऑफिसात बनतो कोलूचा बैल
किती केली मरमर भेटत नाही बढती
पाहून घरचे सारेच मलाच रागा भरती

जेवण करतो जणू घोडा खातो घास
घामाने अंगाचा नुसता येतो वास
दमतो करून रोज तोच तो नाच
नाही खात कुणाकडून कवडीची लाच

डोळ्यात माझ्या स्वप्न होती हजार
ऑफिसच्या राजकारणात झाली हद्दपार
कोणी आहे अधिकारी तर कोणी लाचार
काही करतात काम काही नुसतेच संचार

हीच आहे कामाची नित्य दिनचर्या
यात माझ्या हाडाचा लय वाजतो बोऱ्या
पायता पायता वेळ अशीच जाईल निघून
एक दिवस रिटायरमेंट बाहेर देईल झोकून


 ©Rani Amol More

18 comments:

 1. हकिकत आहे कर्मचार्यांची. सुंदर ��

  ReplyDelete
 2. Very true...Bhashechi lajjat lay bhari

  ReplyDelete
 3. Its like ... स्वतःला बघितलं हे वाचताना👌👌👌

  ReplyDelete
 4. Reality 👍👍 of office life

  ReplyDelete
 5. लय भारी.... वर्हाडी ठसका...

  ReplyDelete
 6. True situation of govt employee

  ReplyDelete
 7. ����������मस्तच.

  ReplyDelete
 8. सत्य परिस्थिती, छान मांडनी👌

  ReplyDelete
 9. छान मांडणी वास्तव्य दर्शन

  ReplyDelete
 10. मनापासून काम करणाऱ्या प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यांची व्यथा .

  ReplyDelete
 11. रोज रोज तोच नाच....नेमक्या शब्दात सुरेख वर्णन

  ReplyDelete
 12. True.. Govt Employees daily life.

  ReplyDelete

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

पर्यावर्णिय बदल, मानसाच्या जाती आणि आरक्षणे

सध्या परिस्थितीचा विचार लक्षात घेता असे दिसून येते की मानसाला भविष्यामध्ये स्वत:ला माणूस म्हणून टिकून राहण्यापेक्षा स्वत:च्या जाती धर्मांची ...

Most Popular Posts