Search This Blog

Saturday, August 8, 2020

सारांश



ग्राम पंचायती आणि सरकारी शाळांच्या
भिंतीवर सुविचारांची रंगोटी झाली
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश सुसंस्कृत आणि सुशिक्षित झाला

वकिलीच्या अनेकांना पदव्या मिळाल्या
स्वतंत्र न्याय प्रणालीचा स्विकार झाला
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश न्यायप्रिय आणि अन्यायमुक्त झाला

कोट्यावधींची बजेट सादर झाली
योजनांचा सर्वत्र थर साचू लागला
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश समृद्ध आणि सधन झाला

पर्यावरण कार्यक्रमाला हजेऱ्या वाढल्या
‘झाडे लावा, झाडे जगवा’ जप सुरु झाला
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश हिरवागार आणि प्रदुषणमुक्त झाला

प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांना चालना दिली
जाहिरातींचा सपाटा भलताच वाढला
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश सामान्य माणसाचा आवाज झाला

सर्वच धर्मांना आणि भाषांना आश्रय दिला
साऱ्या सणाला सुट्ट्याही मिळाल्या
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश धर्मनिरपेक्ष आणि ऐकतावादी झाला

सिनेमागृहात राष्ट्रगीत अनिवार्य झाले
"वन्दे मातरम्" नारेही गुंजू लागले
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश आता भक्तीमय आणि देशप्रेमी झाला

रानमोती काव्यसंग्रहातून.....


12 comments:

  1. हे सारं पाहून आम्हाला वाटलं..! ही कविता सर्व महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करून विचार करायला भाग पाडते. अप्रतिम.

    ReplyDelete
  2. After 70years these Questions needs to be examined in true sense. Let’s hope it will.

    ReplyDelete
  3. मस्त सर्व विषय एकाच कवितेत मांडले गेले

    ReplyDelete
  4. खूप छान सर्व विषय कवितेत सादर केली आहे...

    ReplyDelete
  5. खुप गंभीर्यपूर्ण लिखान.. शुभेच्छा!

    ReplyDelete
  6. Happy Independence Day.. Jay Hind.

    ReplyDelete
  7. Jay Hind Jay Bharat..

    ReplyDelete
  8. जय संविधान जय विज्ञान

    ReplyDelete
  9. जय संविधान जय विज्ञान

    ReplyDelete
  10. जय हिंद

    ReplyDelete

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

क्या सागर, क्या किनारा।

सागर की लहरे, एक छोटे कंकड को बडी तेजी से उछल उछल कर किनारे तक ले जा रही थी। उस कंकड को बडी खुशी हुई, ये सोचकर कि मै इन लहरो के किसी काम का ...

Most Popular Posts