Search This Blog
Saturday, October 24, 2020
Wednesday, October 7, 2020
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे !

हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे !
शतकानुशतके स्त्रीने सहन केलेला अन्याय दूर करण्यासाठी
पुरुष प्रधान संस्कृती मध्ये स्त्रीत्वाचा ठसा उमटविण्यासाठी
यशाच्या उंच शिखरावर पोहचून देशाचा बहुमान वाढवायचा आहे
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे !
प्रत्येक स्त्रीच्या मनात नवचेतना पेटविण्यासाठी
पुरुषांपेक्षा स्त्रिया कमी नाही हे पटवून देण्यासाठी
साऱ्या पुरुषांची मान एकदातरी आदराने झुकवायची आहे
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे !
सारी गगने कर्तुत्वाच्या शक्तीने भेदून टाकण्यासाठी,
स्त्री-शक्ती संघटीत करून देशाला सुसंस्कृत बनविण्यासाठी,
समाजातील प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देऊन तिचा आदर्श व्हायचं आहे
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे !
संवैधानिक अधिकार स्त्रियांना मिळवून देण्यासाठी
स्त्रियांचा आत्मविश्वास, अस्मिता व हक्क जपण्यासाठी
समाजातील अतृप्त नराधमांचा समूळ नायनाट करायचा आहे
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे !
स्त्रियांच्या कला, गुणांना व कौशल्याला वाव देण्यासाठी
सशक्त व कीर्तिवंत स्त्रीत्वाचा ठसा सर्वत्र रुजविण्यासाठी
समाजामध्ये स्त्रियांना वंदनीय स्थान प्राप्त करून द्यायचे आहे
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे !

Sunday, September 27, 2020
सृष्टीस दान

डरकाळी तेजस्विनीची फुटताच
बरसला मेघराज
सरी ओल्या पडताच
धरणी नटली हिरवा साज
कड्या कपारीतुनी वाहताच धारा
बहरली सरीताराणी
पाहून पिसाट वारा
वृक्षवेली हसती मनी
होताच ओलीचिंब माती
सुगंध दरवळला
पाखरे किलबिल गाती
समुद्रही खवळला
निसर्गा तुझा रंगता खेळ
जणू ठरते वरदान
बसतो फुला फळांचा मेळ
करण्या सृष्टीस दान
सोनकळी

ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी
हा वारा वेडा पिसा
फिरे तिच्यावरी
तिच्या अवती भवती
पिंगा मारी
ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी
तिच्या सुंदर रंगाने
तिच्या सुंदर रूपाने
तिच्या मनमोहक सुगंधाने
वारा गुंतला तिच्यावरी
ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी
पावसाच्या थेंबांनी
ओली चिंब होऊनी
हळुवार स्पर्शानी
मोहित त्याला करी
ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी
रवी किरणात सोनकळी
भासे चांदणी क्षितीजातली
हसुनी मनमोकळी
वाऱ्यासंगे डूली लागली
ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी

Sunday, September 20, 2020
भूल करू नका..!

आहे सुकलेले पान म्हणुनी
तुडविण्याची भूल करू नका
मी तर अजूनही चिरतरुण
लढ म्हणण्याची भूल करू नका
स्वाभिमान अजूनही जागा
अपमान करण्याची भूल करू नका
अंत:करणात तेज अजूनही जागे
कमकुवत समजण्याची भूल करू नका
वेळ सुवर्ण संपली म्हणून
विसरण्याची भूल करू नका
जिंकेल तुम्हा पुन्हा हरवून
परास्त समजण्याची भूल करू नका

वेळ
वेळ अदृश्य असूनही
दृश्य आहे
वेळ अज्ञानी असूनही
ज्ञानी आहे
वेळ अरुप असूनही
स्वरूप आहे
वेळ विकृती असूनही
कृती आहे
वेळ अपूर्ण असूनही
परिपूर्ण आहे
वेळ शून्यत्व असूनही
पूर्णत्व आहे
वेळ दुःखांत असुनही
सुखांत आहे
वेळ सर्वांची असूनही
कुणाची नाही
Saturday, September 19, 2020
बिडी

पारावरच्या माणसाने
पेटवली होती बिडी
आयुष्याच्या अंताची
चढत होता शिडी
हळू हळू बिडीचा
धूर सुरु झाला
विचारांचा थवा त्याने
भुतकाळात नेला
धुराने डोळे त्याचे
होत होते लाल
बिडीचं बंडल त्याने
असंच संपवलं होतं काल
जशी जशी बिडी
जळत जात होती
त्याच्याही काळजाला
भाजत नेत होती
श्वास आत घेऊन
तो तिला चेतवत होता
कुठेतरी मनाला
आतूनच खात होता
धुरासंगे दुःखं त्याला
वाटत होती धूसर
क्षणभर का होईना
पडला त्यास विसर
पिपंळाच्या झाडाला
टेकवला त्याने कणा
उरलेल्या बिडीला
आयुष्याच्या अंताची
चढत होता शिडी
हळू हळू बिडीचा
धूर सुरु झाला
विचारांचा थवा त्याने
भुतकाळात नेला
धुराने डोळे त्याचे
होत होते लाल
बिडीचं बंडल त्याने
असंच संपवलं होतं काल
जशी जशी बिडी
जळत जात होती
त्याच्याही काळजाला
भाजत नेत होती
श्वास आत घेऊन
तो तिला चेतवत होता
कुठेतरी मनाला
आतूनच खात होता
धुरासंगे दुःखं त्याला
वाटत होती धूसर
क्षणभर का होईना
पडला त्यास विसर
पिपंळाच्या झाडाला
टेकवला त्याने कणा
उरलेल्या बिडीला
Subscribe to:
Comments (Atom)
Recent Posts
Mumbai’s teen innovator and author Arjit More wins International Excellence Award 2026
Teen author and innovator Arjit More from Washim has been honoured with the International Excellence Award 2026 for his research-driven writ...
Most Popular Posts
-
मैंने अक्सर खामोश रहना पसंद किया, पर पता चला लोग अपनी अपनी राय बनाकर बात करना शुरू कर दे, उससे पहले मेरा बात करना जरूरी है। पेड़ पर सुन्दर सु...
-
बूँदों की अपनी बड़ी होशियारी है, मिट्टी में मिले तो वजूद दिखाती है, पानी में मिले तो, ख़ुद ही मिट जाती है - रानमोती / Ranmoti
-
बहीण बघते भावाची वाट ओवाळणी कराया सजले ताट बहरून आली श्रावण पौर्णिमा दिसता बहीण सुखी झाला चंद्रमा सुरेख राखीला रेशीम धागे भाऊ उभा बहिणीच्या...
-
रानमोती प्रस्तुत "चार या भिंतीत" हे नवीन मराठी गीत प्रतीक आहे, पती पत्नीच्या सुंदर, सहज, प्रेमळ नात्याचं, आशेचं, दोघांमधील नात्याल...
-
दोस्त एंटरटेनमेंट है आपके तनाव का दोस्त एक्सपीरियंस है आपके साथ का दोस्त डिटेक्टर है आपकी बुराई का दोस्त पैरामीटर हे आपके बर्ताव का दोस्त प्...
-
ग्राम पंचायती आणि सरकारी शाळांच्या भिंतीवर सुविचारांची रंगोटी झाली हे सारं पाहून आम्हाला वाटलं देश सुसंस्कृत आणि सुशिक्षित झाला वकिलीच्या अन...
-
बाई एसटी माई सांग कव्हा येशील डोस्क्यावरचं गठुडं गावी कव्हा नेशील वाट पाहत बसलो कव्हाचं फाट्यावर आता तरी ये आम्हा गरीबाच्या वाट्यावर बाई एसट...
-
अगर ईश्वर जीवनभर परीक्षा लेते है, तो मेरे ख़याल से रिजल्ट मरने के बाद ही आता होगा.. - रानमोती / Ranmoti
-
स दियों से समंदर के किनारे, एक ज्वालामुखी गर्म होकर अपनी चरमपर, ज्वालायें बरसा रहा था। जब तूफान आता, तो समंदर ज्वालाओ को ठंडा करने के लिए, अ...




