
कोणी वेडयाने मना तुला दगड मारला
डोळयाच्या कडेतुनी अश्रू वाहला
आनंद सोडून गुलामीत रमला
कुणासाठी जग सोडून एकटाच उरला
कोणी वेडयाने मना तुला दगड मारला
धडधडत्या हृद्यात श्वास कोंडला
अपमानाचा शिक्का जणू नशिबी गोंदला
जीव ज्याने तोडला त्यालाच मानला
साचलेल्या दु:खाला पाझर फुटला
कोणी वेडयाने मना तुला दगड मारला
अनमोल जीव आता बेमोल जाहला
स्वार्थाचा घाव असा किती सहला
विश्वासाचा धागा जागीच तुटला
नात्याचा गोडवा नावापुरता उरला
कोणी वेडयाने मना तुला दगड मारला
- रानमोती / Ranmoti












