चीऊताई आणि छोटा मुलगा
हि गोष्ट आणि संवाद आहे एका चीऊताई आणि एका छोट्या मुलाची सारंगची. सारंग रोज सकाळी
उठून जेव्हा घराच्या बालकनीत बसतो तो बघतो एक चीऊताई सतत काही तरी शोधत असते. ती आपल्या घरटयासाठी काडया एकत्रीत करत असते. तेव्हा
सारंग च्या मनात येते की जर चीऊताई माझ्याशी बोलू शकली असती तर...
दुस-या दिवशी तो चीऊताईला बोलण्यासाठी तिच्या जवळ जाऊन उभा राहतो.
चिऊताई :- (गाने गुनगुनत) मला वाटते, बसुनी विमानी, अफाट गगनी हिंडावे किंवा सुंदर नौके मधुन..........काय मेल ते आठवत पण नाही या कामाच्या गोंधळात ....
सारंग :- अगं अगं चीऊताई मी गाऊ पुढची
ओवी.
चीऊताई :- तुला येते ? हो गा बर बाळा.
सारंग :- हो हो येते.
चीऊताई :- मग गौण दाखव बर बाळा.
सारंग :- मला वाटते, बसुनी विमानी अफाट गगनी हिंडावे
किंवा सुंदर नौकेमधुनी समुद्रातूनी भटकावे..
चिऊताई :- वा ! वा !
अगदी बरोबर हुशार आहेस तू. मला सांग तुझ नाव काय ?
सारंग :- माझ नांव सारंग आहे.
चीऊताई तु माझ्याबरोबर खेळशिल का ? आपण खुप मज्जा
करु
चिऊताई :- नाही रे बाळा मला अजीबात वेळ नाही
बघ ! आत्ताच कुठे काडया जमा करतेय मला एक नवीन घरट बनवायचय, मी
नंतर कधी तुझ्याबरोबर खेळेन..... (आणि चिऊताई भुरकुन उडून जाते.)
सारंग :- काळजी
घे चीऊताई स्वत:ची, म्हणत तोही नीघुन जातो.
(खुप दिवसानंतर जेव्हा चीऊताईचे घरटे बनते आणि त्यात तीचे पील्ले
सुरक्षीत असतात तेव्हा सारंग परत येतो चीऊताईला हळूचकन आवाज देतो.)
सारंग :- चीऊताई ये चीऊताई
चिऊताई :- घाबरुन अचानक दचकेत अरे काय सारंग मी केवढे दचकले
बघ ना माझे पिल्ल ही घाबरले बोल काय म्हणतोस
सारंग :- अग चिऊताई मला की नाही तुला एक गम्मत सांगायची
आहे.
चिऊताई :- पीलान्ना भरवत काय बर ती सांग लवकर
सारंग :- चिऊताई मी ना काल जवळच्या
शेतात गेलो होतो आणि तेथे हिरवगार शेत आहे आणि छान टपोरे ताजे हिरवीगार दाने आहेत,
तुझ्या आवडीचे तु माझ्याबरोबर चल मी तुला शेतात घेऊन जातो आपण खुप खेळू.
चिऊताई :- अरे बाबा नको, माझी पील्ल
इथे एकटी राहतील . त्यांना कोणी खाऊन टाकेल मी नाही येऊ शकणार,
तुझ्याबरोबर मला माफ कर.
सारंग :- ठीक आहे चिऊताई मी नंतर कधी येईल तु काळजी
घे तुझ्या पीलांची आणि स्वत:ची सुध्दा.
(काही दीवसानंतर चीमणीचे पील्ल मोठी होतात पंख
फैलवतात आणि उडून जातात.)
चिऊताई :- एकटी उदास एका झाडाच्या फांदीवर बसुन गाने गात
या पिलांनो परत फिरा रे .....
(तेवढयात सारंग येतो आणि तो
चिऊताईला बघुन दु:खी होतो..)
सारंग :- चिऊताई, तुला एक गोष्ट सांगू
चिऊताई :- सांग बाळा मी ऐकतेय
सारंग :- चिऊताई तु ना आम्हा माणसाच्या आयांसारखी
आहे. उडायचं आणि आनंदाच्या खुप संधी येतात पण आपल्या घरटयासाठी, आपल्या मुलांसाठी
सा-या आनंदाचा त्याग करतात आणि मुल मोठी झाली की उडून जातात आणि
मग ती आई सुद्धा दु:खी आपल्या मुलाच्या आठवणीत तुझ्यासारखे गाने
गुनगुनते.
या मुलांनो परत फिरा रे.........
धन्यवाद...............
*****