Search This Blog

Tuesday, June 23, 2020

तूच ठरव..



एका श्वासाचा तू मालक
दुसऱ्यावर नाही तुझी मालकी
कुठल्या भ्रमात आहेस वेड्या
क्षणभर जीवन विकत घेण्याची
तूच ठरव आहे का तुझी लायकी ?

दुर्गुणांनी वेढलास किती
डोक्यावर अहंकाराचा केवढा भारा
जीवनाच्या व्याख्या असतील कितीक
खरे जीवन आहे तरी काय
नुसता आत बाहेर सोडलेला वारा

चेहऱ्यावर स्मित फुलण्यासाठी
दुसऱ्यांची गरज तुला भासते
डोळ्यातले अश्रू गाळण्यासाठी
इतरांची भिती का वाटते
तूच ठरव कसा तू स्वावलंबी

तेला विना वात जळणार नाही
संवेदनेशिवाय सुख-दु:ख कळणार नाही
तूच ठरव कसे जगायचे
जीवन आनंद अमृत प्राशायाचे
की शिक्षा मिळाल्यागत भोगायचे

अध्यात्म ही किती वाचून झाले
अनेक महात्मे सांगून गेले
जोवर अंतराला जाणणार नाही
तोवर जीवन आनंद गवसणार नाही
तूच ठरव कसे शोधायचे

- राणी अमोल मोरे

Monday, June 22, 2020

कितना बोया..




ऐ मेरे देश के भूमिपुत्र
तेरे कर्म देते है जीवन के सूत्र

सदियों से हल चलाके तूने
भूकों का हल है निकाला
मेहनत करने की तूने
न जाने कौनसी सीखी पाठशाला

मुट्ठीभर बीज बो कर तूने
हरतरफ हरयाली है लायी
दिन रात की मेहनत से तेरे
देश में समृद्धी है आयी

तू क्यूँ सोचे फांसी का फंदा
रब का तू बड़ा ही नेक बंदा
कितना बोया कितना कटाया
बदले में तूने कुछ नही पाया

तू कर ख़ुदको ही सलाम
नही तू किसी समस्या का गुलाम
खड़े रहना हमेशा तान सिना
बहाया तूने अपना खून पसीना

- राणी अमोल मोरे 

Sunday, June 21, 2020

भक्ता ! काय ते भले


 
भक्ता ! काय ते भले

'देवा तू उभाच’ अजून कसा रे दमला नाही
विटेवरच्या विठ्ठलाला भक्त कधी बोलला नाही
पंढरपुरी वारी करण्या मात्र कधी डगमगला नाही
वरवरचा जप सोडता 'सत्य' कधी समजलाच नाही

चंद्रभागेत डुबक्या मारून पाणी करतो घाण
विठ्ठलाची पंढरी भक्ता सांग कशी दिसेल छान
मागच्या वर्षी पाच लाख यावर्षी दहा लाख
सोडून जातात फक्त प्रदूषणाची सडकी राख

गर्वाने सांगतो आपण यात्रेला परदेशीही आले
त्यांचही मनं दुखते जेव्हा दिसतात सुंदर नदीचे नाले
लाईव्ह दाखवतात चॅनलवाले सारी ती गर्दी
घरी परतल्यावर अर्ध्यांना झाली असते सर्दी

घंटा वाजवून, टाळ बडवून तो जागा होत नाही 
माय बाप सुखी नसतील तर देव कधी पावत नाही
विठ्ठलाचं देवपण आम्हाला कधी कळलंच नाही
पंढरीच्या यात्रेला सांगा अर्थ कसा उरेल काही

खुळ्या भक्तांना पाहून विठ्ठल होत असेल दंग
विटेवरून खाली न उतरण्याचा त्यानेही बांधला चंग
परंपरा सांगते पंढरीच्या यात्रेला एकदा तरी जावं
अंतर्मनाच्या शुद्धतेसाठी सर करावं पंढरपूर गावं

अज्ञानाच्या गर्दीत भक्ता सांग तू कुठे हरवलास
संतांच्या विचारांचा खडू तू का नाही गिरवलास
लोक कल्याणासाठी त्यांनी जीवन अर्पण केले
तरी तुला कळलेच नाही तुझ्यासाठी 'काय ते भले'

- रानमोती



Friday, June 19, 2020

..इस वतन से



कसूर क्या था उनका
घर वापस आ ना सके
बहुत समझ ली दुनियादारी
उनका समर्पण समझ ना सके

ज़मीन की लालच में
दुश्मन हरपल डाले डेरा
सुरक्षित रहेगा देश हमारा
जब तक है जवानों का घेरा

विश्व में वर्चस्व के
लग रहे है नारे
आज लड़ रहे है चिनी
तो कल लड़ते थे गोरे

पूँछ लो एक दफ़ा
खुदही अपने दिल से
क्या सच में हमें
प्यार है इस वतन से

तो भूल जाओ सब
आपस का लढ़ना
शुरू करो मिलके
एक साथ जुड़ना

साथ रहेंगे हम उनके
जो सोचे इस देश का
मिटा देंगे हम उनको
जो साथ दे गद्दारों का

दिखा देंगे दुनियाँ को
ज़ोर करोडो भारतीयों का
ताकि उठ ना सके सिर
फिर कभी दुश्मनों का

- राणी अमोल मोरे

सून काय सासू काय - दोघी सेम सेम


सून काय सासू काय  - दोघी सेम सेम

नखरेल सुनेला बघून,
खट्याळ सासू झाली गरम

सासूने केली तोफ, दणक्यात सुरु
कोपऱ्यात मात्र, सून रडे भुरुभुरु

कशी मारली फोडणी, ठसका उडाला 
मोबाईलच्या नादात पोरी, रस्सा जळाला

गोल गोल पोळ्यांचा, झाला बघ त्रिकोण 
स्टेटसच्या नादात तुझं, घरात असते मौन
 
बेसिनमध्ये भांड्याचा, रचला केवढा कळस
तरी डिपीमध्ये सर्वांच्या, तुझाच बाई सरस
 
कपाटात गठ्ठा, तुझ्या हजार साड्यांचा 
लेकाने भरला हप्ता, आजच भाड्याचा
 
मोकळ्या तुझ्या केसांची, स्टाईल लय भारी
गळतात जागोजागी, थोडी बांध त्याला दोरी
 
बारा बारा वाजेपर्यंत, चालते तुझी चॅटिंग
एवढ्या वेळात तर बाई, मी हजार पापड लाटीन 

सून म्हणाली सासूबाई, आता सोडा जुना नाद
मॉडर्न बनून तुम्हीही, जरा द्याना मला साद

फेसबुकवर तुम्हाला, देते अकाउंट काढून
मग तुम्हीही बसाल त्यात, निवांत डोळे घालून

मग काय सुरु झाला, दोघींचा मोबाईल वाला गेम
सून काय सासू काय, आता दोघी सेम सेम

 
- राणी अमोल मोरे
😅                   😆

Thursday, June 18, 2020

अंतरी


अंतरी

मानवा अंतरी शोधना 
चित्त तुझे ध्यानी लागले 

भय यातना अंत पावल्या 
करूना त्या डोळ्यात वाहिल्या 
देव जाहला मन मंदिरा 
न शोधला कुणी दुसरा 

तू रमता बाह्य स्वरात 
अंतरी नाद दाटूनी आले 
दुखः मिळाले असल्यात 
सत्याने सुख शोधुन पाहिले 

तू जसा फुलला अंतरी 
पडू दे प्रतिमा बाहेरी 
नको अडकू खोट्या रुपात 
तू शोभशी तुझ्याच स्वरुपात 

कर्माने मिळाले तुजला 
जाण त्या निष्ठेला 
नको शाश्वताच्या वाटी 
ना उरेल काही पाठी 

जाण तू ज्ञान महान 
ना कोणी मोठे लहान 
ठेविले ज्याने भान 
त्यासी मिळे निर्वाण


घामाचे मोती


घामाचे मोती

जाम घाम तुला आला 
बस थोडा विसाव्याला 
आहे काळजी देणाऱ्याला 
उगाच चिंता कशाला 

उगवेल सूर्य पहाटेला 
येईल यश तुझ्याही वाटेला 
फुलेल फूल देठाला 
मिळेल भाकर पोटाला 

शक्ती माती पोसण्याची 
गरज फक्त पाण्याची 
होईल जमवाजमव दाण्यांची 
हीच वेळ तग धरण्याची 

शिगोशिग भरतील पोती 
आनंद फुलेल तुझ्याही भोवती 
होतील तुझ्या घामाचे मोती 
मग सारे सुखाने नांदती


Recent Posts

Mumbai’s teen innovator and author Arjit More wins International Excellence Award 2026

Teen author and innovator Arjit More from Washim has been honoured with the International Excellence Award 2026 for his research-driven writ...

Most Popular Posts